स्वच्छ गाव, निरोगी समाज

कागनरी ग्रामपंचायतीचे स्वच्छता उपक्रम

स्वच्छतेचा संकल्प

ग्रामविकासाचा पाया – स्वच्छता आणि जनजागृती

गावातील स्वच्छतेचा संकल्प

कागनरी ग्रामपंचायतीने ग्रामस्वच्छतेला केवळ एक मोहिम न समजता तो ग्रामविकासाचा अत्यंत महत्त्वाचा पाया मानला आहे. गावातील स्वच्छता ही आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक सुरक्षिततेशी निगडित असल्याने प्रत्येक नागरिकाला यात सक्रिय सहभाग देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रत्येक घरात शौचालयाची सुविधा,  सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, सांडपाणी नियोजन, नाले स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापन या सर्व गोष्टींची ग्रामपंचायतीकडून नियोजनबद्ध अंमलबजावणी केली जाते. प्लास्टिकमुक्त ग्रामपंचायत, कचऱ्याचे स्त्रोत-स्तरावर वर्गीकरण, कंपोस्ट निर्मिती आणि सफाई कर्मचारी यांच्या माध्यमातून सातत्यपूर्ण स्वच्छता राखली जाते.

स्वच्छता ही केवळ सरकारी जबाबदारी नसून सामुदायिक कर्तव्य आहे, हा संदेश प्रत्येक ग्रामस्थापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामुळे गाव अधिक आरोग्यदायी, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण बनत आहे, तसेच Smart Gram संकल्पनेला खऱ्या अर्थाने बळ मिळत आहे.

स्वच्छता आणि ग्रामविकास उपक्रम

ग्रामपंचायतीद्वारे राबविलेले मुख्य स्वच्छता आणि पर्यावरण सुधारणा उपक्रम

घरगुती शौचालय बांधणी

हागणदारीमुक्त अभियानांतर्गत गावातील सर्व घरांमध्ये शौचालये पूर्णपणे उभारण्यात आली आहेत.

बंदिस्त गटारी

बंदिस्त गटारी रचल्यामुळे डासांचे प्रमाण घटले आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण झाले आहे.

waste-water

सांडपाणी आणि गटारी व्यवस्था

सांडपाणी वाहिन्या व गटारींची प्रभावी रचना करून पाणी प्रवाह व निचरा सुधारला गेला आहे.

जनजागृती

जनजागृती

प्रत्येक घरात स्वच्छतेचे संदेश पोहोचवून लोकांना सहभागी केले आहे.

garbage-collection

कचर्‍याचे संकलन

घोडागाडी/लहान वाहनाद्वारे घरगुती व सार्वजनिक कचरा गोळा करून योग्य प्रकारे विल्हेवाट केली जाते.

save-environment

पर्यावरण संवर्धन

परिसर स्वच्छ करून वृक्षारोपण केले गेले आणि हरित वातावरण निर्माण केले आहे.

छायाचित्रे

घरगुती शौचालय

सर्व घरांमध्ये शौचालयांची सुविधा उपलब्ध करून, गावाला स्वच्छ आणि सुरक्षित बनवणे.
शौचमुक्त गावाच्या उद्देशाला हातभार लावणारा उपक्रम.

बंदिस्त गटर

गावातील पाणी वाहतूक आणि सांडपाणी नियोजनासाठी बांधलेल्या गटरची सुविधा.
स्वच्छता आणि रस्त्यांवरील पाणी साचण्यापासून संरक्षण करते.

घनकचरा व्यवस्थापन​

पिशव्यात भरलेला कचरा सुरक्षित वाहनाद्वारे वाहून नेला जातो, ज्यामुळे गाव स्वच्छ राहते.

घनकचरा व्यवस्थापन​

गावातील घरगुती आणि सार्वजनिक कचरा घोडा किंवा लहान वाहनाद्वारे सुरक्षितपणे गोळा केला जातो.

Scroll to Top