कर भरणा
गावातील तसेच गावाच्या हद्दीतील सर्व वाडी-वस्त्यांमधील नागरिकांना कळविण्यात येते की, आपल्या घरपट्टी, पाणीपट्टी, पिण्याच्या पाण्याच्या नवीन कनेक्शनची ठेव रक्कम आणि सर्व थकबाकी रक्कम ३१ नोव्हेंबर २०२५ पूर्वी भरावी.
जर कागनरीसह सर्व वाडी-वस्त्यांतील नागरिकांनी ही रक्कम वेळेत भरली, तर कागनरी ग्रामपंचायतीला मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात १० गुण मिळतील. यामुळे गाव आणि वाड्यांवरील विविध विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध होईल आणि गावाच्या प्रगतीस हातभार लागेल.
आता घरपट्टी आणि पाणीपट्टी घरबसल्या भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. आपल्या ग्रामपंचायतीने कर भरण्यासाठी QR कोड सुविधा सुरू केली आहे. घरपट्टी आणि पाणीपट्टीची रक्कम विचारून खालील QR कोडद्वारे सहजपणे भरता येईल. या सुविधेमुळे नागरिक आणि ग्रामपंचायतीचा वेळ वाचेल व भरण्यानंतर पावत्या ग्रामपंचायतीचे कर्मचारी घरपोच देतील.

कृपया घरपट्टीची रक्कम भरण्यासाठी वरील QR कोड स्कॅन करा.
